![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कार्यस्थळावर जमीन लिलाव रदद्ची लावण्यात आलेली नोटीस. |
दौलत हलकर्णी /
प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड)
येथील कारखान्याच्या जमिनीचा आज ७ डिसेंबर 2018 रोजी होणारा लिलाव स्थगित करण्यात
आल्याचे जाहीर उद्घोषणा पत्र कार्यस्थळाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले
आहे.
साखर आयुक्ताच्या
आदेशानुसार चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे लिलावाची प्रक्रिया पार पाडणार होते. मात्र
दौलत बचाव कृती समिती, सभासद, कामगार व राजकीय पक्षांच्या लिलावा विरुध्दच्या तिव्र भावना लक्षात घेता हा
लिलाव रद्द केल्याचे उद्घोषणा पत्र जाहीर केली आहे. यावेळी तहसिल कार्यालयाच्या
वतीने मंडल अधिकारी पी. एस. खरात व हलकर्णीचे तलाठी सी. डी. म्हसवेकर यांनी दौलत
साखर कारखान्याच्या गेटवरील नोटीस बोर्डवर उद्घोषणाची प्रत चिकटवली. यावेळी
चंदगडचे पोलिस निरीक्षक श्रीप्रसाद यादव फौजफाटयासह उपस्थित आहेत.
No comments:
Post a Comment