कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) च्या विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा व
सांस्कृतिक स्पर्धेत केंद्रीय प्राथमिक शाळेने उल्लेखनीय यश प्राप्त केले. किणी येथे नुकत्याच झालेल्या क्रीडा
स्पर्धेत शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आर्या रमेश कुंभार हीने इयत्ता पहिली
ते पाचवीच्या गटातील मुलींच्या विभागात 50 मीटर
धावणे प्रथम, 100 मीटर धावणे तृतीय, उंच उडीत तृतीय क्रमांक पटकावला. तर मलतवाडी येथे संपन्न झालेल्या
सांस्कृतिक स्पर्धेत कथाकथन विभागात प्राजक्ता विनायक कुंभार इयत्ता चौथी हिने
प्रथम क्रमांक पटकावला. नाट्यीकरण विभागात मध्ये शाळेने प्रथम क्रमांक पटकावला यात
प्रणव नारायण पाटील, माऊली पुंडलिक दळवी, ईश्वरी मेगेरी, प्राजक्ता
विनायक कुंभार, लक्ष्मण तोगलेकर, रेहान शहानुर मुल्ला यांनी उत्कृष्ट अभिनय केला. याशिवाय समूहनृत्य
विभागात शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. यातील प्रथम क्रमांक विजेत्या संघ व
विद्यार्थ्यांची चंदगड तालुका स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व
विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील, अध्यापिका लता सुरंगे, कविता
पाटील, भावना आतवाडकर, उज्वला नेसरकर, श्रीकांत आपाजी
पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव सर्व
सदस्य, केंद्रप्रमुख विलास कांबळे आदींचे
प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment