![]() |
पुणे येथे सौ. अंजली जोशी यांना `पुरस्कार' देताना डॉ. अजयचंद्र भागवत, पल्लवी भागवत आदी. |
चंदगड / प्रतिनिधी
ज्योतिषशास्त्र म्हणजे क्रियाशील अध्यात्म होय. काळाच्या उदरात दडलेल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न ज्योतिषी करतो. संकटातून सावरण्याची शक्ती संपादन करण्यासाठी माणसाने अध्यात्माकडे वळावे असे प्रतिपादन जेष्ठ कवयित्री प्रतिभा मोडक यांनी केले. पुणे येथे गुरूकुल विद्यापीठातर्फे आयोजीत अखिल भारतीय ज्योतिष संमेलन २०१८ चे उद्घाटन कवयित्री प्रतिभा मोडक व संयोजक समितीचे अध्यक्ष डॉ. अजयचंद्र भगवंत यांच्या उपस्थीतीत संपन्न झाले. यावेळी जोतिष सिद्देश्वर मारटकर, विजय जशतदार आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी चंदगड तालुक्यातील सौ. अंजली अजय जोशी (हलकर्णी, ता. चंदगड) यांना ज्योतिष शास्त्राच्या प्रसाराबद्दल 'ज्योतिष प्रेरणा पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराबद्दल जोशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment