कोवाड / प्रतिनिधी
निट्टूर (ता. चंदगड) येथे के. बी. पाटील
फौंडेशनच्यावतीने माजी सभापती कै. कृष्णा बाळू पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त दि. २२ व २३
डिसेंबर रोजी कबड्डी व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा
नरसिंह विद्यालयात होणार आहेत. शनिवार
(दि. २२ ) रोजी दुपारी चार वाजता ६० किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा सुरू होणार
आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश मूल्य ५०१ रुपये आहे. विजेत्या संघाना ११,१११, ७,७७७
व ५, ५५५ अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. रविवार (दि. २३ )
डिसेंबर रोजी लहान व मोठ्या गटात वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. लहान गट (१ली ते ४थी) वेळ ५ मिनीटे आहे.
स्पधेचे विषय - वाचनाचे महत्व, माझा आवडता नेता, हिंदवी
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराज, चला वाचू
पर्यावरण. विजेत्यांना २२२२, ११११, ७७७ अशी बक्षिसे
देऊन गौरविण्यात येणार आहे. मोठा गट (५वी ते १०वी) वेळ ७ मिनीटे. विषय - युवकानो
मोबाईलपासून सावधान, शेतकऱ्यांसमोरील आव्हाने, माझ्या
स्वप्नातील भारत, चला निसर्गाशी संगत करू. विजेत्याना ३३३३, २२२२व
११११ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. रात्री ८ वाजता हास्यसम्राट संभाजी यादव
यांचे 'हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा ' या
विषयावर व्याख्यान होणार आहे, तरी सर्वानी याचा लाभ घ्यावा, असे
आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment