गुरुकुल चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने जानेवारीमध्ये अभिनय स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2018

गुरुकुल चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने जानेवारीमध्ये अभिनय स्पर्धाचंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हौसी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गुरुकुल चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे रविवारी 13 जानेवारी 2018 रोजी चंदगड येथे अभिनय (क्टिंग) स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अशी माहीती गुरुकुल चॅरीटेबल ट्रस्टचे ड. रवि रेडेकर यांनी दिली. चंदगड तालुक्यात अशी स्पर्धा पहिल्यादांच होत आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 100 रुपये असून कला सादर करण्यासाठी दोन मिनिटांचा कालावधी आहे. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 5001 रुपये व चषक, द्वीतीय क्रमांकासाठी 3001 रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी 1001 रुपये व चषक यासह अन्य शंभर बक्षिसे चषक स्वरुपातील असतील. हि स्पर्धा केवळ चंदगड तालुक्यातील कलाकारांच्यासाठी असून अभिनय वैयक्तिकरित्या सादर करावा. स्पर्धक अठरा वर्षा वरील असावा. रंगभूषा व वेशभुषा कलाकाराने स्वत: करायची असून 31 डिसेंबर 2018 पूर्वी नावनोंदणी करावी. स्पर्धेला येताना ओळखपत्र व फोटो सोबत आणावा. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना ॲड. रवि रेडेकर लिखित आगामी महानाट्यामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ड. रेडेकर यांच्याशी 8888776624 / 25 या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment