चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील भगतसिंग ॲकॅडमी व हॉलिडे स्टोअर इंडिया
यांच्या संयुक्त विद्यमाने 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. गुरुवारी
13 डिसेंबर 2018 रोजी स्पर्धा हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या
पटांगणावर सकाळी साडेसात वाजता होईल अशी माहीती भगतसिंग ॲकॅडमीचे संचालक भारत
गावडे यांनी दिली.
स्पर्धेसाठी 50 रुपये प्रवेश शुल्क असून विजेत्यांना अनुक्रमे 3000,
2500, 2000, 1500, 1000, 700, 500, 300 व मेडल पारितोषिक स्वरुपात देण्यात येईल.
स्पर्धकांनी 12 डिसेंबर 2018 पर्यंत नाव नोंदणी करायची असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी
आधारकार्ड आवश्यक आहे. स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी श्री. गावडे यांच्याशी
7798948100 व 9552493304 या मोबाईल नंबरवर किंवा अकॅडमीच्या हलकर्णी व चंदगड
शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment