![]() |
चंदगड येथील ग्रामपंचायत. |
चंदगड / अनिल
धुपदाळे
चंदगड
नगरपंचायतीसाठी चंदगडवासीय प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून
रविवारी रात्री चंदगड मधील काही ठराविक लोक मुंबईला रवाना झाले आहेत. चंदगड ग्रामपंचायतीला
नगरपंचायतीचा दर्जा मिळावा. यासाठी गेले कित्येक महिने चंदगड वासीय संघर्ष करत आहेत. याप्रश्नी सरकारकडून
केवळ तारीख पे तारीख ऐकवली जात होती. मात्र अलीकडील महिन्यांमध्ये चंदगड नगरपंचायतीचा
विषय लोकांनी डोक्यावर घेतल्याने अखेर शासन निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे
एकंदर हालचालीवरुन दिसते.
जिल्ह्याचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी
गेल्या आठवड्यात चंदगड येथील
स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते या शिष्टमंडळाच्या मागणीनुसार नगरपंचायतचा दर्जा
देण्याबाबत पत्र मुत्र्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पाठवले होते. हे पत्र नगर
विकास मंत्रालयाच्या आधीन असून यावर येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची दाट शक्यता
आहे. याप्रश्नी चंदगड नगरवासीयांनी केलेल्या संघर्षाला यश मिळणार असल्याचे दिसते. चंदगड
हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति महाबळेश्वर म्हणून अलीकडील दशकांमध्ये ओळखले जात
आहे. या ठिकाणी पर्यटनाला येणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत आहे. चंदगड या ठिकाणी सर्व
शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे ठिकठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना नागरिकांची
मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबर वाढती लोकसंख्या यामुळे अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीला मूलभूत सुविधा
प्राप्त करून देताना नाकेनऊ येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नगरपंचायत मिळण्यासाठी
सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चंदगड ग्रामपंचायतीच्या
होऊ घातलेल्या निवडणुकीवर शहरवासीयांनी बहिष्कार घातला. चार वेळा ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने चंदगड वासीयांच्या भावना सराकरपर्यंत पोहोचल्या
आहेत.
नगरपंचायत व्हावे हा सर्वपक्षीय
विषय आहे. सत्तेत असलेल्या भाजप कडून नगरपंचायत
देणे क्रम प्राप्त आहे. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता भाजप सरकार
कटिबद्ध असल्याचे स्पष्ट होत असून या मागणीसाठी गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे
वक्तव्यावरून कदाचित येत्या दोन दिवसात नगरपंचायत दर्जासाठीचे पत्र नगर विकास
विभागाकडून मिळण्याची दाट शक्यता आहे. चंदगड मधील सर्वच नागरिकांनी नगरपंचायतीसाठी
मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनातून व उपोषणातून पाठिंबा देऊन भावना
व्यक्त केल्या होत्या.
मात्र या
मागणीच्या पूर्ततेसाठी स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जोर लावून
धरल्यामुळे आता या प्रश्नी लवकरच तोडगा निर्णय होण्याची दाट शक्यता असून या दोन
दिवसात चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होत असल्याचे पत्र मिळण्याची शक्यता
आहे. चंदगड नगरपंचायतीसाठी नगरपंचात कृती समिती, प्रमुख नेतेमंडळी, ग्रामस्थ यांनी
मागणीला जोर लावला आहे. पालक मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या सहकार्याने शेवटच्या टप्यात हा
प्रश्न भाजपचे युवा उद्योजक सुनील काणेकर, चंद्रकांत
दाणी, ॲड. विजय कडूकर उमेश शेलार, सिध्देश
कोरंगावकर आदींनी हे पूर्वीपेक्षाही अधिक प्रयत्न करत आहेत.
![]() |
अनिल धुपदाळे, चंदगड |
No comments:
Post a Comment