मंत्री रामदास आठवलेना धक्काबुक्की करणाऱ्यावर कडक कारवाई करा - तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2018

मंत्री रामदास आठवलेना धक्काबुक्की करणाऱ्यावर कडक कारवाई करा - तहसिलदारांना निवेदन

मंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करणाऱ्यावर कडक कारवाई करावी. या मागणीचे निवेदन तहसिल कार्यालयात देताना आरपीआयचे कार्यकर्ते. 


चंदगड / प्रतिनिधी
रिपब्लीकन पार्टी फ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रवीण गोसावी या व्यक्तीने अंबरनाथ (मुंबई) येथे कार्यक्रमावेळी धक्काबुक्की केली. हि घटना क्लेशदायक असून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. प्रवीण गोसावी या माथेफिरुला कडक शासन करावे व मंत्री आठवले यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी  इंडियाच्या चंदगड शाखेच्या वतीने केले आहे. याबाबतचे निवेदन चंदगडचे तहसिलदार यांच्याकरवी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना दिले.
रामदास आठवडे यांनी सन 1973 पासून दलित पँथर सन 1978 पासून भारतीय दलित पँथर व सन 1990 पासून आर. पी. आय. (ए) च्या माध्यमातून संपुर्ण देशभर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आदी राष्ट्रपुरुषांचे समता, बंधुता, न्याय व लोकशाही विचारानवर आधारीत चळवळ सर्व समाजामध्ये पोहोचवली आहे. परिवर्तनाची ज्योत कामयपणे तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशा बहुजन समाजासाठी काम केलेले नेते रामदास आठवले 8 डिसेंबर 2018 रोजी आयोजित आर. पी. आय. (ए) व सुमेश पवार युथ फौंडेशन यांच्या वतीने संविधान गौरव दिन आणि बहुजन महोत्सव कार्यक्रम संपवून मंचावरुन खाली उतरत असताना प्रवीण गोसावी याने धक्काबुक्की केली. हि घटना निंदनीय असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून आरपीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. निवेदनावर श्रीकांत कांबळे, मनोहर कांबळे, दिलीप कांबळे, दिपक माळी, बशीर मुल्ला, नारायण कांबळे, हरिबा कांबळे, मोहन योगीरे, शिवाजी कांबळे, सहदेव कांबळे, दत्ता देशमुख, लक्ष्मण कांबळे यांच्या सह्या आहेत.


No comments:

Post a Comment