![]() |
डुककरवाडी (रामपूर) येथे मळणी यंत्राच्या साह्याने नाचणा पिकांची मळणी करताना शेतकरी. |
बैल व ट्रॅक्टरच्या मळणीला फाटा देत चंदगड
तालूक्यात मळणी यंत्राच्या सहाय्याने नाचना (नागली) ची मळणी जोरात सूरू असून
शेतकरी मळणी यंत्रालाच अधिक पंसती
देत आहे. सुगीच्या शेवटी
शेतकरी नाचण्याची मळणी करतात. त्यादृष्टीने शेतकरी नाचणा (नागली) पोती रचून
ठेवतात. सुगीतील सर्व पिकांच्या मळण्या झाल्या नंतर शेवटी डिसेंबर महिन्यात नाचणा
पिकांच्या मळणी कडे लक्ष देतात. पूर्वी नाचना पिकांची मळणी खळ्यावर बैल व अन्य
जनावारांच्या रेड्यांच्या सहाय्याने काढली जायची. दिवसागणित आधुनिकतेत होणारी वाढ
लक्षात घेता अलीकडील पाच वर्षात ट्रॅक्टरच्या सह्याने मळणी केली जात
आहे. क्विंटलला 80 रूपये असा दर असल्याने त्वरीत व कमी कष्टात नाचना मळून मिळत
आहे. यामुळे वेळेची मोठी बचत झाली आहे. त्यामुळे शेतकरी मळणी यंत्रालाच पंसती देत
आहेत.
No comments:
Post a Comment