![]() |
कालकुंद्री शाळेत स्मृतिदिनानिमित्त वह्या वाटप करताना सोनार कुटुंबातील सदस्य व शिक्षक |
कालकुंद्री (प्रतिनिधी)
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रामदास धोंडीबा
कालकुंद्रीकर, वसंत धोंडीबा शेटजी व शालन कारेकर या बंधू
भगिनींचे गतवर्षी एकाच महिन्यात निधन झाले होते.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुटुंबीयांनी वर्षश्राद्धच्या पारंपरिक
पद्धतीला फाटा देत तीच रक्कम शाळा व गावासाठी देणगी देण्याचा स्तुत्य उपक्रम
राबवला.
कुटुंबातील सदस्य दीपक कालकुंद्रीकर, किशोरी
हळदणकर, पौर्णिमा व उमेश गडकरी, अमिता
भुर्के, रोहित सोनार, राणी कारेकर, विवेक
देवस्थळी आदींनी गावातील सार्वजनिक चौकात बसण्यासाठी सिमेंट व फायबरची चार बाक, शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. यावेळी मुख्याध्यापिका माया पाटील, व्ही. एम. पाटील, मोहन
गाडीवडर, सुजाता सरवणकर, सविता कुंभार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती
अध्यक्ष अन्वर शेख, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या महिन्यात गावातील बाळू ज्योती पाटील
यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी सार्वजनिक वाचनालयाला पुस्तके
देणगी देण्याचा उपक्रम राबवला होता. या घटनांवरून पारंपरिकतेतून विधायक उपक्रमाकडे
समाज वळत आहे याची जाणीव होते.
No comments:
Post a Comment