शिवानंद सुरेश शिदगौंड |
कोवाड / प्रतिनिधी
कागणी (ता. चंदगड) येथील शिवानंद सुरेश शिदगौंड नेट परीक्षेत उत्तीर्ण झाला. दिल्ली विद्यापीठ आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत त्याने मराठी विषयातून हे यश मिळविले. यापूर्वी शिवाजी विद्यापीठातून एम. ए. व म्हैसूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या कर्नाटक राज्य सेट परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. यापुढे पीएचडी करण्याचा मानस असून त्याला शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख व जेष्ठ साहित्यीक डॉ. राजन गवस, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कोवाड येथील श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालयाचा तो माजी विद्यार्थी आहे. प्रा. एस. डी. सावंत, प्रा. ए. टी. पाटील, प्रा. एस. एस. खवनेवाडकर यांचे त्याला सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment