दौलत
हलकर्णी / प्रतिनिधी
राजमाता
जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंती निमित्य महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी
सेना चंदगड यांच्या मार्फत भव्य रांगोळी स्पर्धचे आयोजन शनिवार १२ जानेवारी २०१९
रोजी सकाळी १० वाजता महादेव वांद्रे पॉलिटेक्नीक, डी. एड. बी. एड कॉलेज तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे आयोजित केल्याची
माहीती तालुका अध्यक्ष राज सुभेदार यांनी दिली. या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मनसेमहीला
जिल्हाध्यक्ष रायगड सौ. सपनाताई देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्ष
मराठी क्रांती सेना विठ्ठल पेडणेकर,
मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश
चौगुले, अध्यक्ष दि महाराष्ट्र एज्युकेशन अॅण्ड स्पोटर्स अॅकडमीचे महादेव वाद्रें उपस्थित
राहणार आहेत. तरी हौशी स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment