![]() |
हलकर्णी महाविद्यालयात भित्तीपत्रकाच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यी. |
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाणिज्य मंडळ उद्घाटन, भित्तीपत्रक उद्घाटन व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक ऋतुजा कांबळे हिने केले. प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर, कृषी मंडल अधिकारी युवराज पाटील, उद्योजक राजु व्हटकर, प्रा. ए. बी. मगदुम, प्रा. एस. एम. शहापूरकर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत प्रा. जी. जे. गावडे, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. जी. पी. कांबळे यांनीपुष्पगुच्छ देवुन केले. वाणिज्य मंडळ फलकाचे उद्घाटन कृषी मंडल अधिकारी युवराज पाटील यांनी केले. प्रा. डॉ. निंबाळकर व राजु व्हटकर यांनी भित्तीपत्रकाचे अनावरण केले. पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन प्रा. ए. बी. मगदुम, प्रा. एस. एम. शहापूरकर यांनी केले. 'जागो ग्राहक जागो' हा विषय घेवून वाणिज्य विभागाच्या सुमारे तीस विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक पोस्टर सादर केली होती. भित्तीपत्रकातून चंदगड तालुक्यातील यशस्वी उद्योग काजु प्रक्रीया, पॉली हाउस, कुकूटपालन, पोल्ट्री, नाचना उद्योग बद्दल माहीती सादर केली. पोस्टर स्पर्धेचे परिक्षण प्रा. डॉ. राजेश घोरपडे, प्रा. सौ. प्रियांका नौकुडकर यांनी केले. या स्पर्धेत दिपाली रानोबा पाटील, रामचंद्र सुतार, मयुरी महीपती यांनी अनुक्रमे तर उत्तेर्जनार्थ सोनाली पाटील यांनी व सर्व बी कॉम वर्ष दोनच्या विद्यार्थ्यानी पटकावला. या सर्व यशस्वींचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यी, पालक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. सुत्रसंचालन प्रा. व्ही. डी. पाटील यांनी तर आभार प्रा. एन. एन. गावडे यांनी मानले.
1 comment:
छान उपक्रम !
Post a Comment