प्रो-कबड्डीतील यु-मुम्बाचा आघाडीचा खेळाडू सिध्दार्थ देसाई |
कोवाड / प्रतिनिधी
हुंदळेवाडी (ता. चंदगड) गावचा
सुपुत्र व प्रो-कबड्डीतील यु-मुम्बाचा आघाडीचा खेळाडू सिध्दार्थ देसाईचा हुंडळेवाडी
ग्रामस्थांनी नागरी सत्कार आयोजित केला आहे. रविवार (ता. १३) रोजी दुपारी ३ वाजता
आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन केले आहे. प्रो-कबड्डीच्या
पहिल्याच प्रयत्नात सिध्दार्थने आक्रमक चढाया करून यु मुम्बा संघाची अखेरपर्यंत
विजयाची घोडदौड राखली होती. दहा वेळा सुपर ट्रॅकल करुन गुणांचा दोनशेचा टप्पा पार
केला होता. त्यामुळे विरोधी संघातील खेळाडूंच्यात धडकी भरली होती. आपल्या संयमी व
तंज्ञशुध्द खेळामुळे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरातून
त्याच्या चाहत्यांचा जल्लोष होता. आपल्या मातीतील खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी चंदगड
तालुक्यातून शेकडो क्रीडा प्रेमीनी पुणे, मुंबई येथील सामन्याना हजेरी लावून आनंद लुटला होता.
हुंदळेवाडी सारख्या छोट्या खेड्यातून कबड्डीचे स्वप्न उराशी घेऊन गेलेला सिध्दार्थ
गेली पाच वर्षे प्रो स्पर्धेची संधी शोधत होता. अखेर प्रो-कबड्डीच्या सहाव्या
सिझनमध्ये यु-मुम्बा संघात खेळण्याची त्याला संधी मिळाली. पहिल्याच प्रयत्नात
सिध्दार्थने झंझावत खेळ केल्याने हुंदळेवाडी परिसरातील ग्रामस्थानी नागरी सत्कार
करण्याचे नियोजन केले आहे. कोवाड मधून ढोल ताशाच्या गजरात ट्रॅक्टरमधून मिरवणूक
काढण्यात येणार आहे. कोवाड ते हुंदळेवाडी गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मानवी
साखळी तयार केली जाणार असून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली जाणार आहे. संपूर्ण गावभर
सडा रांगोळी टाकून सुहासनि औक्षण करणार आहेत.
No comments:
Post a Comment