कोवाड महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य आर. एस. निळपणकर व इतर मान्यवर. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसाच्या विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचा उद्धाटन समारंभ संपन्न झाला. शिबिराचा शुभारंभ बाळासाहेब कोकीतकर यांचे ध्वजारोहण करुन झाला. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे होते.
प्रारंभी कृष्णा गोविंद पाटील यांच्या हस्ते सावित्री फुलेंचे प्रतिमापूजन झाले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांनी श्रमसंस्काराचा हेतू व स्वरूप मांडले. सरपंच राजेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. एम. जे. पाटील, बाळासो कोकितकर यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात डॉ. जांभळे म्हणाले, श्रमसंस्कार शिबिरातून गावाचा, देशाचा विकास साधता येतो. प्रबोधन, हे समाज जागृतीच काम होय. सर्वानी एकत्र येऊन ग्रामविकास साधता येतो. यासाठी सर्वांनी या शिबीरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे संचालक बी. आर. पाटील, बी. के. पाटील, एम. जे. पाटील, शाहू फर्नाडीस, लक्ष्मण कडोलकर, दत्तात्रय नाईक, यशवंत सोनार, बाळकृष्ण मुतगेकर, आर. जे. पाटील यांच्यासह मराठी विद्यामंदिर, हायस्कूलचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मंडळांचे पदाधिकारी, प्राध्यापक, स्वंयसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. एस. एम. पाटील यांनी केले. आभार डॉ. पी. के. वाघमारे यानी मानले.
No comments:
Post a Comment