कागणी ग्रामस्थांची गुरुवारी कोवाड विज केंद्रावर विविध मागण्यांसाठी धडक - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2019

कागणी ग्रामस्थांची गुरुवारी कोवाड विज केंद्रावर विविध मागण्यांसाठी धडक

कोवाड (ता. चंदगड) येथे गुरूवारी विज केंद्रावर विविध मागण्यासाठी धडक देवून चर्चा करण्यासंदर्भातीत निवेदन देताना कागणी ग्रामस्थ.

तेऊरवाडी / प्रतिनिधी 
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने कागणी (ता. चंदगड) परिसरात शेतीसाठी चूकीच्या वेळी विजपुरवठा चालू केल्याने व जादा विज बिलासंदर्भात चर्चा करण्यासाठी कोवाड विज उपकेंद्राला गुरूवार (ता. 10) रोजी सर्व ग्राहक व ग्रामस्थ धडक देणार आहेत. 
कागणी परिसरात सद्या सकाळी 6 ते दुपारी 2 असा शेती विज पूरवठा चालू आहे. सद्या या परिसरात ऊस लागण चालू असल्याने थंडीमध्ये सकाळपासून कामगार मिळणे अवघड  झाले आहे. हिच वेळ सकाळी 8 ते 4 अशी ठेवण्याची मागणी ग्राहकांची आहे. त्याबरोबर चूकीच्या विज बिलासंदर्भातही चर्चा करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन विज उपकेंद्राला देण्यात आले आहे. या निवेदनावर नरसिंग बाचूळकर, जनार्दन देसाई, शिवाजी पाटील, पांडूरंग बिर्जे, यशवंत बिर्जे, संतोष  बेळगांवकर, सचिन पाटील, विवेक मनगुतकर, संजय कुट्रे, तुकाराम पाटील आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.



No comments:

Post a Comment