![]() |
सुनील महादेव मोरे |
कोवाड
/ प्रतिनिधी
राजगोळी खुर्द, चन्नेटी, गणेशवाडी
व राजेवाड़ी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनील महादेव मोरे यांची
बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक
विनय संभाजी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली.
महालक्ष्मी ग्रामविकास आघाडीने सरपंच मावळेश्वर
कुंभार यांच्या सरपंचपदाच्या जागेसह नऊ जागा मागील निवडणुकीत घेतल्या होत्या.
त्यावेळी उपसरपंचपदी धौडीबा तोंडले यांची वर्णी लागली होती. आता नव्याने घेतलेल्या
उपसरपंच निवडमध्ये सर्वानुमते सुनील मोरे यांचे नाव पुढे आले. त्यावेळी दतु कडोलकर, नारायण
कडोलकर, गुंडू कांबळे, अनंत कुलकर्णी, शंकर
गुरव, बाजीराव
कडोलकर, गणपत पाटील, मस्जिद अजगर यांच्यासह ग्रामपंचायत, सर्व
सदस्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
![]() |
उपसरपंच निवड झाल्याबद्दल शुभेच्या देताना दत्तू कडोलकर,सरपंच मावलेश्वर कुंभार व ग्रामसेवक विनय संभाजी![]() |
No comments:
Post a Comment