![]() |
कोवाड येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये पत्रकार दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना सुवर्णा पाटील व इतर. |
कोवाड / प्रतिनिधी
समाजबांधणीसाठी पत्रकारांची भूमिका ही मोलाची आहे. आजच्या तांत्रिक पत्रकारितेतही प्रिंट मिडियाने आपली ओळख जपली आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतो. तसेच चांगला समाज घडवण्याचे पवित्र व जबाबदारीचे कामही पत्रकार करतात. त्यामुळे शासन आणि समाज यांच्यामध्ये पत्रकार हा दुवा असल्याचे प्रतिपादन सुवर्णा पाटील यांनी केले.
कोवाड येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये पत्रकारदिन साजरा झाला. त्यावेळी पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीकांत सुळेभावकर होते. संस्था अध्यक्ष डॉ. प्रविण पाटील, डॉ. अर्चना पाटील उपस्थित होत्या. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन सुवर्णा पाटील यांच्या हस्ते झाले. पाटील म्हणाल्या, "आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून विज्ञानाचा प्रचार व प्रसार केल्याने त्यांच्या लेखणीतून विज्ञाननिष्ठ महाराष्ट्र घडविण्याचे काम झाले. नवविचारांचे जांभेकर हे पत्रकारितेचा आधारस्तंभ होते. त्यांच्याच विचारांच्या पत्रकारितेची आज समाजाला गरज आहे. यावेळी मुख्याध्यापक सुळेभावकर यांनी आचार्य बाळशास्त्र जांभेकरांचे समाजकार्य सांगितले. रणजित कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रोहीणी पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. सीमा कांबळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment