राजगोळी खुर्द : येथील राजगोळी खुर्द हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.एन. देसाई रामचंद्र पाटील यांचे भाऊ गणपती पाटील यांचेकडून धनादेश स्विकारताना. |
कोवाड / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील माध्यमिक विद्यालयाला गावचे सुपुत्र रामचंद्र यादू पाटील यांनी शाळेच्या विस्तारीत इमारतीसाठी १ लाख रुपयांची देणगी देऊन आर्थिक सहकार्य केले. मुख्याध्यापक व्ही. एन. देसाई यांचेकडे रामचंद्र पाटील यांनी एक लाखाचा धनादेश सुपुर्द केला. रामचंद्र पाटील यांचा नांदेड येथे व्यवसाय आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे समजताच त्यांनी शाळेला १ लाख रुपयांची देणगी दिली. शाळेने लोकसहभागातून शैक्षणिक उठाव सुरु केला आहे. माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचा त्याला चांगला पाठींबा असल्याने शाळेच्या प्रगतीला गती मिळाल्याचे मुख्याध्यापक देसाई यांनी सांगितले. यावेळी एस. बी. कुंभार, आर. जी. इनामदार, व्ही. एस. मुराभट्टे, एम. जे. पाटील, के.के. पाटील, एस. एस. कडोलकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment