चंदगड येथे शिवेसना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख विजय देवणे. व्यासपीठावर उपजिल्हा प्रमुख श्री. खांडेकर व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड
ग्रामपंचायतीची नगरपंचायत मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये श्रेयवादाचे राजकारण झाले.
चंदगड नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता नाकारता
येत नाही. विधानसभेची रंगीत तामील म्हणून नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे बघणे गरजेचे
आहे. शिवसेनेच्या माध्यमातून चंदगड विधानसभेचा आमदार निवडून द्यायचा आहे.
नगरपंचायतीसाठीच्या पहिला नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार यासाठी चंदगड
नगरपंचायतीचा गड जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हा असे आवाहन शिवसेनेचे
जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केले. चंदगड येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी
ते बोलत होते.
शिवसेनेचे संघटक
संग्राम कुपेकर म्हणाले, ``मुस्लीम बांधवांनी शिवसेनेवर जो विश्वास टाकला आहे. तो सार्थ ठरविला जाईल.
शिवसेनेमध्ये इतराप्रमाणे मुस्लीम बांधवांनाही मान-सन्मान मिळेल. नगरपंचायतीच्या
निवडणुकीमध्ये भगवा फडकविण्यासाठी मुस्लिम समाजाने महत्वाची भूमिका घ्यावी असे
आवाहन केले.`` शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर
खांडेकर म्हणाले, ``शिवसेनेच्या शाखा स्थापन करुन गावागावातील लोकांच्या समस्या व
त्यांच्यावरील होणारा अन्याय दुर करण्यासाठी उभ्या केल्या आहेत. शाखा वाढीसाठी
शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत.`` शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे म्हणाले, ``शिवसेना
नगरपंचायतीसाठी प्रथम रस्त्यावर उतरली. त्यामुळे कोणीही पोस्टर लावून श्रेय घेत
असेल तर ते चुकीचे असल्याचे सांगितले.`` यावेळी सकलेन नाईक यांनी कार्यकर्त्यासह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी फिरोज मुल्ला, अध्यक्ष समीर सय्यद, उपाध्यक्ष वशिम नेसरीकर, शकील नेसरीकर, याकुब मुल्ला, अबुखादर पटेल, चंद्रकांत
शिवनगेकर, शरद गावडे, प्रकाश मुरकुटे,
प्रमोद कांबळे, विशाल गायकवाड, भरमाणा गावडा, शांता जाधव यांच्यासह मुस्लिम बांधव व
शिवसैनिक उपस्थित होते. जमीर आगा यांनी सुत्रसंचालन केले. विजय देसाई यांनी मानले.
चंदगड येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित शिवसैनिक. |
No comments:
Post a Comment