अडकूर / प्रतिनिधी
ग्रामस्थ मंडळ अडकूर (ता. चंदगड) यांच्या वतीने शनिवार 12 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उदयोगपती रमेश रेडेकर यांच्या हस्ते स्पर्धा उद्घाटन होणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 21 हजार रुपये , द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार , तृतिय 10 हजार रूपये, चतुर्थ क्रमांकासाठी 5 हजार रुपये तर उत्कृष्ठ पकड व उत्कृष्ठ चढाई यासाठी 1501 अशी बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ होणाऱ्या या स्पधैचा लाभ संघानी घेण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ अडकूर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment