कोवाड
महाविद्यालयात स्वयमसिद्धा महिला संमेलनाचे उद्घाटन सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे
पूजन करून करताना कांचनताई परुळेकर, प्राचार्य जांभळे, प्राचार्य निळपणकर, एम. जे. पाटील व मार्गदर्शक महिला.
कालकुंद्री
/ प्रतिनिधी
कोवाड (ता.
चंदगड) येथील कला, वाणिज्य
आणि विज्ञान महाविद्यालय आणि सौ. सरोजिनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळ कोल्हापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्धा महिला संमेलन सोमवारी (ता.७) उत्साहात पार
पडले. प्राचार्य ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन कार्यक्रम संपन्न
झाला.
स्वागत
प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी केले. प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. जे. पी.
पाटील यांनी केले. प्रा. एस. एच. महागांवकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी
संस्था सचिव एम. व्ही. पाटील, प्रा. पी. सी. पाटील, एम. जे. पाटील, शाहू फर्नांडीस आदी संचालक उपस्थित
होते. विविध उद्योग व्यवसाय यांची माहिती घेण्यासाठी किणीकर यात भागातील जमलेल्या
सुमारे 300 महिलांना
श्रीमती कांचनताई परुळेकर यांनी विविध उद्योगांची माहिती दिली. यात मेणबत्ती बनवणे, पोपकॉर्न, केळी वेफर्स, स्टील वर्क, ड्रेसिंग
पेपर, तरंगती
रंगोली, कोकलायनर, ऑइल पेंट याबद्दल प्रात्यक्षिकांसह
माहिती दिली. त्यांनी उद्योग-व्यवसायात महिलांनी यशस्वी होण्यासाठी लागणारी सात
तत्वे सांगितली. महिला सध्याच्या विज्ञानयुगात चूल व मूल यापुरत्या मर्यादित
राहिलेल्या नसून त्या पुरुषापेक्षाही कर्तुत्ववान बनल्या आहेत. कर्ज काढून
भरण्यापुरते बचत गट नको असे त्यांनी महिलांना आवर्जून सांगितले. अशा प्रकारचा
चंदगड तालुक्यातील हा पहिलाच कार्यक्रम ठरला. यावेळी स्मिता डोंगरकर, प्रिया भूयेकर, सौम्या तिरोडकर, सुरेखा सुरेश साळुंखे आदींसह विविध
क्षेत्रातील महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका
माने यांनी केले. आभार ज्योती पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment