जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पोलिस निरिक्षकांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2019

जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पोलिस निरिक्षकांना निवेदन

जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पोलिस निरिक्षकांना निवेदन देताना संघटनेचे कार्यकर्ते. 

चंदगड / प्रतिनिधी
सरोळी येथील परशराम यल्लाप्पा नाईक यांच्यावर चालू हल्ला करणाऱ्या चाळोबा रामू धामणेकर यांना अटक करावी. या मागणीचे निवेदन जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका प्रमुख सिताराम नाईक यांनी याबाबतचे निवेदन चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवप्रसाद यादव यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चंदगड तालुक्यातील सरोळी या गावी किरकोळ कारणावरुन परशराम नाईक यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. हा हल्ला चोळाबा धामणेकर यांनी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. घटना घडून आठवडा झाला तरी संबंधिताला अटक केलेली नाही. त्यामुळे त्याला अटक करावी अशा मागणीचे निवेदन जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पोलिस निरिक्षक श्री. यादव यांना दिले आहे. निवेदनावर तालुका युवा अध्यक्ष सुभाष नाईक, जिल्हा युवा उपाध्यक्ष अक्षय नाईक, आप्पाना चिंचनगी, संजय नाईक, जयवंत नाईक यांच्यासह 28 जणांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment