आजरा
(प्रतिनिधी) :
आजरा येथे मंगळवार (दि. ८)
पासून कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन केल्याचे
महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रशेखर फडणीस यांनी सांगितले. सलग पाचव्या वर्षी या नाट्यमहोत्सवाचे
आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार (दि. ८) रोजी
प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, पुणे या
संस्थेचे 'जिंदगी ख्वाब है' हे नाटक सादर होणार आहे. बुधवार (दि. ९) रोजी नाट्य शुभांगी, जयसिंगपूर या संस्थेचे 'तरूण तुर्क म्हातारे अर्क' हे नाटक
सादर होणार आहे. गुरूवार (दि. १०) रोजी अभिरूची, कोल्हापूर या संस्थेचे 'कॅलीगुला' हे नाटक सादर होणार
आहे. शुक्रवार (दि. ११) रोजी नवरंग सांस्कृतिक कलामंच, सांगली या संस्थेचे 'पुस्तकाच्या
पानातून' हे नाटक सादर होणार आहे. शनिवार (दि.
१२) रोजी निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी
या संस्थेचे 'दो बजनिये' हे नाटक सादर होणार आहे. रविवार (दि. १३) रोजी अभिनव कला
थिएटर, पेडणे गोवा या संस्थेचे 'संगित एकच प्याला' हे नाटक
सादर होणार आहे. सोमवार (दि. १४) रोजी साईकला मंच, कुडाळ या संस्थेचे 'घोकंपट्टी
डॉट कॉम' हे नाटक सादर होणार आहे. मंगळवार (दि. १५) रोजी नवनाट्य मंडळ, आजरा या संस्थाचे 'महंत' हे नाटक सादर होणार आहे. सात दिवस या सर्व नाटकांचे सादरीकरण
आजरा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. दररोज नाट्यप्रयोग
संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार
आहे. या नाट्यमहोत्सवाच्या विजेत्यांची निवड नाट्य रसिकांच्या पसंतीनुसार करण्यात
येणार आहे. तसेच मंगळवार (दि. १५) रोजी बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. या
नाट्यमेजवानीचा रसिकांनी लाभ घ्यावा. तिकीटासाठी शंकर उर्फ भैय्या टोपले,
योगेश पाटील यांच्याशी संपर्क
साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीला प्रा. वासूदेव मायदेव,
आय. के. पाटील,
भैया टोपले,
सचिन सटाले उपस्थित होते.
No comments:
Post a Comment