![]() |
अलबादेवी येथे मोफत आरोग्य शिबीरावेळी बोलताना प्रा. सुनिल शिंत्रे |
चंदगड / प्रतिनिधी
सुखी जीवनासाठी उत्तम आरोग्य असणे गरजेचे आहे. धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या. जीवनात जगण्यासाठी जसे काम करणे आवश्यक आहे. तसेच आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच महत्वाचे आहे. अलबादेवी गावासह पंचक्रोशी गावांसाठी कै केदारी रेडेकर रुग्णालयाची दारे कायमस्वरूपी खुली आहेत. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत तडजोड करु नका असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रा. सुनिल शिंत्रे यांनी केले. अलबादेवी (ता. चंदगड) येथे कै. केदारी रेडेकर रुग्णांलय व ग्रामस्थ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराच्या ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चंदगडचे सभापती बबनराव देसाई होते.
प्रास्तविक व सूत्रसंचालन श्रीकांत नेवगे यांनी केले. प्रमुख पाहुणे संस्थचे म्हणून उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर व कोल्हापूर येथील आधार अष्टर हॉस्पिटल चे कॅन्सरतज्ञ बसवराज कडलगे हे होते. यावेळी अनिरुद्ध रेडेकर म्हणाले, ``शासनाच्या विविध योजना रेडेकर हॉस्पिटलमध्ये असून त्या योजना आपल्या पर्यत पोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून अनेक आजारावर मोफत शस्त्रक्रिया होत असून याचा लाभ आपण सर्वांनी घेण्याचे आवाहन केले.`` कॅन्सर तज्ञ बसवराज कडलगे यांनी तंबाखूसह वाढती व्यसनाधीनता हे कॅन्सर चे मूळ कारण असून खास करून तरुणासह सर्वांनी व्यसनापासून परावृत्त होण्याची गरज असल्याचे सांगितले. 198 जणांनी शिबाराचा लाभ घेतला.
सभापती बबनराव देसाई यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. उत्साळी गावच्या सरपंच माधुरी सावंत-भोसले यांनी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी कै. केदारी रेडेकर रुग्णालय हे वरदान ठरत असून या रुग्णांलयात अनेक शस्त्रक्रिया मोफत होत असून त्याचा लाभ इतरांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जयवंतराव देसाई अलबादेवी गावच्या सरपंच रेखा देवळी, उपसरपंच राजाराम पाडले, सुरेश डांगे, ग्रामसेवका अश्विनी कुंभार यांनी ही मनोगते व्यक्त केली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धोंडीबा घोळसे, श्रीकांत नेवगे, उपसरपंच राजाराम पाडले, ग्रामसेवका अश्विनी कुंभार, सुरेश डांगे, रघुनाथ कोले, यशवंत घोळसे, विठोबा मोरे, बंडू घोळसे, शशिकांत दोरुगडे, भिकाजी कोले, सुनीता पाडले, रुक्मिणी मोरे, कृष्णा भादवनकर, गुरुनाथ देवळी, वैभव डांगे, निधी कोले, गोविंद कोले, मारुती डांगे, मनोहर कोले, विमल दोरुगडे, परशराम चौकुळकर, दिनकर कोले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत वैभव डांगे यांनी तर आभार न्यू हायस्कूलच्या मुख्याध्यापीका श्रीमती बागे यांनी मानले.
No comments:
Post a Comment