दाटे येथे शनिवारपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2019

दाटे येथे शनिवारपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, विविध कार्यक्रमांचे आयोजन



मजरे कार्वे / प्रतिनिधी
दाटे (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी घटप्रभा परिसर सामुदायिक 36 वा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शनिवार 12 जानेवारी ते शुक्रवार 18  जानेवारी 2019 अखेर संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 शनिवार 12 जानेवारी 2019 सकाळी सात वाजता दीपप्रज्वलन गणेश पूजन घटपूजन, ज्ञानेश्वर महाराज मूर्ती पूजन, विठ्ठल रखुमाई फोटो पूजन, विना पूजन, श्रीकृष्ण मूर्तीपूजन, भागवत गाथा पूजन, दासबोध ग्रंथ पूजन, पताका पूजन, ग्रंथपूजन, तुकाराम गाथा पूजन, व्यासपीठ पूजनतुळस पूजननित्य पूजन, ध्वजारोहण या कार्यक्रमाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 3 परिसरातील महिलांचे भजन, दुपारी तीन ते पाच हरिपाठ, सायंकाळी सहा ते सात प्रवचन व रात्री साडे सात ते दहा निरूपण व त्यानंतर हरिजागर होणार आहे. 
शनीवार 12 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजता ह. भ. प. पुंडलिक लक्ष्मण धुरी यांचे प्रवचन आयोजन करण्यात आले आहे.  रात्री साडे सात ते दहा वाजता ह. भ. प. नामदेव गोरल यांचे कीर्तन होणार आहे. रविवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते सात वाजता ह. भ. प. दत्तू वाईंगडे यांचे प्रवचन व रात्री साडे सात ते दहा वाजता ह. भ. प. संजय पाटील यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते सात ह-भ-प नंदकुमार गावडे यांचे प्रवचन व रात्री साडे सात ते दहा वाजता ह-भ-प गजानन शिनगारे रा. सांगोला यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवार 15 जानेवारी रोजी ह. भ. प. एम. पी. पाटील कावणेकर यांचे प्रवचन व रात्री साडे सात ते दहा वाजता ह. भ. प. डॉ. शिवाजीराव पन्हाळे उत्तुर यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार 16 जानेवारी रोजी ह. भ. प. विठ्ठल फड यांचे प्रवचन व ह-भ-प वामन महाराज जाधव भागवताचार्य मुरंबीकर (बीड) यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार 17 जानेवारी रोजी ह भ प राणबा महाराज आसगाव व ह. भ. प. डॉ. विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन व ह भ प नवनाथ मस्के (शिर्डी) यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवार 18 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वैष्णव वारकरी ज्ञान भूषण ह. भ. प. भाऊसाहेब पाटील (शेकिनहोसुर) यांचे काला कीर्तन होणार असून त्यानंतर दिंडी व महाप्रसाद होणार आहे. हा महाप्रसाद कै. नरसिंगराव पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश पाटील (संचालक गोकुळ दूध, व केडीसीसी बँक) यांच्याकडून देण्यात येणार आहे. या महाप्रसादानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment