माडखोलकर महाविद्यालयाचे 10 ते 16 जानेवारी अखेर कोकरे येथे श्रमसंस्कार शिबीर - चंदगड लाईव्ह न्युज

07 January 2019

माडखोलकर महाविद्यालयाचे 10 ते 16 जानेवारी अखेर कोकरे येथे श्रमसंस्कार शिबीर


चंदगड / प्रतिनिधी
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीने 10 ते 16 जानेवारी 2019 या कालावाधीत कोकरे (ता. चंदगड) येथे विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबाराचे उद्घाटन तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी दिली.
गुरुवारी ता. 10 रोजी शुभारंभ होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अड. एस. आर. पाटील असतील. गटविकास अधिकारी आर. बी. जोशी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित रहाणार आहेत. शुक्रवारी ता. 11 तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रावजी कांबळे यांच्या हस्ते श्रमदानाला प्रारंभ होईल. यावेळी आरोग्य अधिकारी स्नेहल मुसळे-पाटील यांचे महिला सबलीकरण व आरोग्य या विषयावर व्याख्यान होईल. शनिवारी ता. 12 डॉ. प्रकाश साळुंके (सहा. व्यवस्थापक, गोकुळ) यांच्या उपस्थितीत पशुचिकित्सा शिबीर आयोजित केले आहे. रविवारी ता. 13 सेंद्रीय शेती या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड मार्गदर्शन करतील. सोमवारी ता. 14 ॲड. रवि रेडेकर कायदेविषयक मार्गदर्शन करतील. मंगळवारी ता 15 ला सायंकाळी साडेसहा वाजता जिल्ह्याचे ब्लॅक पॅँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई आधुनिक भारतापुढील समस्या या विषयावर बोलतील. रात्री साडेनऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. बुधवारी ता. 16 सकाळी साडेअकरा वाजता श्रमसंस्कार शिबीराचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला माजी रोहयो मंत्री भरमू पाटील प्रमुख पाहुणे तर प्रा. आर. पी. पाटील अध्यक्षस्थानी असतील. संपुर्ण शिबीरामध्ये ग्राम स्वच्छता, गटर सफाई, सार्वजनिक रस्ता दुरुस्ती, समाज प्रबोधन चर्चा, महिला आरोग्य व शिक्षण, सर्वेक्षण, पशु संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन यासह अन्य उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्वांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन एनएसएस विभाग प्रमुख प्रा. एस. एन. पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment