![]() |
दिंडलकोप (ता. चंदगड) येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने शाखा उद्घाटन प्रसंगी मान्यवर. |
जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने गाव तेथे
शाखा काढून लोकांचे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या
वतीने दिंडलकोप (ता. चंदगड) येथे शाखा सुरु करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख
पाहुणे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ता
प्रविण
दादा नाईक, चंदगड तालुका युवा उपाध्यक्ष रवि नाईक , युवा सचिव चंदगड
तालुका जयवंत नाईक व समाज सेवक सचिन नाईक, विश्वनाथ नाईक हजर
होते.
या कार्यक्रमाचे वेळी दिंडलकोप गावातुन बसवानी सनदी चंदगड तालुका तालुका संघटक, यलाप्पा सनदी चंदगड
तालुका संघटक या पदी निवड करण्यात आले. भैरू नाईक चंदगड तालुका युवा सदस्यपदी निवड
करण्यात आली. निवडीचेवेळी दिंडलकोप गावचे संजय सनदी, मारुती सनदी, मलेश नाईक, केंचापा नाईक, प्रशांत तरवाळ, बसवानी नाईक, कलापा सनदी, सतापा सनदी, विलास नाईक, सचिन सनदी, सुरेश नाईक, संतोष नाईक, बाळेश नाईक, काशिनाथ नाईक, दिपक नाईक, सुरेश नाईक, इरापा नाईक, मंजुनाथफ हुलमणी, सुरेश बी. नाईक, सतापा न. सनदी यांच्यासह इतर मान्यवर होते.
No comments:
Post a Comment