शासनाने पत्रकारांना पाठबळ द्यावे - श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खिद्रापूर येथे पत्रकार पूरस्कार वितरण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2019

शासनाने पत्रकारांना पाठबळ द्यावे - श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खिद्रापूर येथे पत्रकार पूरस्कार वितरण सोहळा


खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या आदर्श पत्रकार पूरस्कार  वितरण कार्यक्रमात बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, शात्रज्ञ डाॅ. शिवराम भोजे, समीर देशपांडे, छत्रपती ग्रुपचे प्रमोद दादा पाटील.अध्यक्ष सुधाकर निर्मळे, दगडू माने व इतर. 
पेड न्यूज मूळे वर्तमान पत्रांच्या विश्वासहर्तेला धोका - शात्रज्ञ डाॅ. शिवराम भोजे
चंदगड / प्रतिनिधी
  पत्रकार हा समाजाचा आरशा आहे. समाजात जनजागृती करण्याचे काम पत्रकारामूळेच होत असते. पत्रकारांचे संघटन ही काळाची गरज आहे. लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाने अर्थिक पाठबळ दिले पाहिजे.  असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यानी केले.
      ते  खिद्रापूर (ता.शिरोळ) येथे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या आदर्श पत्रकार पूरस्कार    वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.प्रारंभीआद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व वृक्षरोपांना पाणी घालून समारंभास प्रारंभ झाला. पत्रकार असोशिएशनचे अध्यक्ष सूधाकर निर्मळे यानी प्रास्ताविक करून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला.
             यावेळी पदमश्री डॉ. शिवराम भोजे म्हणाले की,पत्रकारांनी समाजाभिमुख पत्रकारिता सेवेचे व्रत जोपासले पाहिजे.  बातमीतील सत्यता शोधण्याचे काम चाणाक्ष वाचक करीत असतात . राजकारण अथवा अन्य घटका पासून दूर राहून पत्रकारिता केली पाहिजे थोडक्यात व मुद्देसूद  बातमी हवी. अलीकडच्या काळात फेक बातमी देऊन विचारांचा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण या स्पर्धेच्या काळात फेक नको चेक असणारी सत्य बातमी हवी.पेड न्यूज मूळे सध्या पत्रकार वर्तमानपत्राच्या विश्वासहर्तेलाच धोका निर्माण झाला आहे अशी खंत त्यानी व्यक्त केली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव समीर देशपांडे म्हणाले, शहरी व ग्रामीण पत्रकार व त्यांचे प्रश्न त्यांची घुसमट सुरू आहे,  त्यांना सन्मानाने जगण्याइतपत योग्य व समाधानकारक मानधन मिळायला हवे व त्यांच्या आरोग्याचे प्रश्न याबाबत विशेष लक्ष देण्याची गरज आहे.पत्रकारांचे आरोग्य व अन्य  सेवा सुविधा देण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबत संघटना पातळीवर आम्ही पाठपुरावा करीत आहोत असे त्यांनी सांगितले.यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या भागाचा विकास साधण्यासाठी शासनाकडून भरीव नाधीची गरज आहे. या धार्मिक व पर्यटन स्थळाला  शासनाकडून  निधी  मिळेल वभागाचा विकास होईल असे लिखाण पत्रकारांनी   करण्याची गरज आहे. यावेळी प्रा रवींद्र पाटील लिखीत जागल्या  विशेषांकाचे व इंद्रधनुष्य पुस्तकाचे  प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
     यावेळी नंदकुमार राजाराम कांबळे (कागल) इलेक्ट्रॉनिक मीडिया बीन्यूज,महालिंग दत्तात्रय पाटील दै. पुढारी ( जि. बेळगांव)जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार - प्रा.रवींद्र  बाबासो पाटील दै.सकाळ,(कबनूर ) व तालुका उत्कृष्ट पत्रकार  संपत रामाणा पाटील दै.महाराष्ट्र टाईम्स , (चंदगड ) मुकुंद चंद्रकांत पवार संपादक साप्ताहिक (शाहुवाडी)इकबाल महंमदहनिफ रेठरेकर -एस न्यूज -(गगनबावडा) डॉ. निवास महादेव वरपे लोकमत (करवीर),  प्रकाश आनंदराव खतकर दै. तरूण भारत(भुदरगड)मधुकर शिवाजी किरुळकर दै. तरुण भारत (राधानगरी)विवेक यशवंत दिंडे दै.सकाळ (हातकणंगले)विनायक हिंदुराव पाटील दै.तरुण भारत (गडहिंग्लज)धनाजी सदाशिव गुरव दै. पुढारी (पन्हाळा) संतोष सुभाष बामणे दै. पुण्यनगरी (शिरोळ ) समीर जीवनराव कटके दै. तरूण भारत (कागल )रमेश श्रीपती चव्हाण दै. महाराष्ट्र टाईम्स (आजरा)अनिल राजू तोडकर दै. पुण्यनगरी  (हातकणंगले) यांना  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
         यावेळी सचिव सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी,सरपंच हैदरअली मोकाशी, मराठी पत्रकार परिषद कोल्हापूर महानगर अध्यक्ष ताज मुल्लाणी, कोषाध्यक्ष नंदकुमार कुलकर्णी,  अॅड. प्रशांत पाटील,कौन्सिल सदस्य अतुल मंडपे, सुरेश कांबरे, प्रा.भास्कर चंदनशिवे, दयानंद लिपारे,लक्ष्मण कांबरे, डॉ.टी. एस. पाटील,सलीम खतीब, जागल्या स्मरणिकेचे संपादक जिल्हा संघटक प्रा. रवींद्र पाटील , अवधूत आठवले, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, अनिल धुपदाळे, रवींद्र पाटील, चंदगडचे समन्वयक प्रा. अशोक पाटील,तालुका अध्यक्ष संतोष तारळे, विनोद पाटील ,दयानंद खानोरे ,चेतन शेरेगार,संतोष सणगर, भाऊसाहेब सकट, सुहास जाधव, आनंदा काशिद, विवेक स्वामी, बाळासाहेब चोपडे, अरूण तळेकर, कृष्णात माळी, अशोक पाटील, , रविंद्र हिडदुगी, संजय पाटील, नंदकूमार ढेरे, संतोष सूतार,संतोष भोसले,यूवराज पाटील,विजय कांबळे,राजेंद्र शिवनगेकर,अमर वरुटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कौन्सिल सदस्य दगडू माने यांनी आभार मानले.
विविध तालुक्यातील पुरस्कारप्राप्त पत्रकार व मान्यवर मंडळी.




No comments:

Post a Comment