मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील आयोजित कुस्ती मैदानात कुस्ती लावताना पै. विष्णू जोशीलकर व इतर. |
माडेंदुर्ग (ता. चंदगड) येथे पार पडलेल्या कुस्ती मैदाणात घिस्सा डावावर पै. कृष्णात सावंत याने पै. विनोद बडकुद्री यांच्यावर विजय मिळवला. अटीतटीच्या लढतीत पै. कृष्णात सावंत याने मिळवलेल्या विजयाची कुस्ती शौकिंनाना एक पर्वणीच ठरली. आंतराष्ट्रीय कुस्तीपटु व प्रशिक्षक राम व लक्ष्मण पवार या बंधुणी आयोजित केलेल्या कुस्ती मैदाणात ह्या कुस्त्या पार पडल्या.
प्रारंभी मांडेदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षणाच्या केद्रांच्या पायाभरणीचा शुभारंभ महाराष्ट्र केसरी पै. विष्णु जोशिलकर याच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, उद्योजक रमेश रेडेकर, शिवशंभु प्रतिष्ठानचे विठ्ठल पेडणेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खाडेंकर, एम. जे. पाटील उपस्थित होते.
" चंदगडच्या लाल मातीतला पैलवान सातासमुद्रापार विजयी झेंडा फडकवला पाहीजे. त्यासाठी राम व लक्ष्मण पवार सारखे जिद्दी कुस्तीगिर तालुक्यात निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व सोयीणियुक्त प्रशिक्षण केद्रांची गरज होती. हे प्रशिक्षण उभा करण्यासाठी अर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे. त्याबद्दल खासदार सभांजीराजे छत्रपती याच्यासमवेत शासणाकडून निधी मिळवण्यासाठी चर्चा झाली आहे. राजेंनी सकारात्मक दुजोरा देऊण लवकरच पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या आहेत " असे प्रतिपादन पै. विष्णु जोशिलकर यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना भरमुअण्णा पाटील म्हणाले, " तालुक्याला मागास म्हणुन असणारी उपमा ही केव्हाच नेस्तनाबुत झाली आहे. राम व लक्ष्मण ह्या जोडीने कुस्ती ध्यास घेऊण आपल्या सारखे तालुक्यात चागंले कुस्तीपटु तयार व्हावे यासाठी प्रशिक्षण केद्रांची उभारणी करत आहेत. ही चंदगड तालुक्यातील जनतेसाठी मानाची गोष्ट आहे. अशा ह्या चागंल्या कार्यासाठी आपण सदैव पाठीशी राहु असे सागिंतले.
" चंदगड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही कधीच कमी पडणार नाही. क्रिडा क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती करणाऱ्या प्रत्येकाला रेडेकर फाउंडेशन तर्फे सर्व बाजुनी मदत केली जाईल. शासणा कडुन काही निधी मिळऊण देण्यास आपण कटीबध्द असल्याचे उद्योजक रमेश रेडेकर यांनी सागितले. यावेळी विठ्ठल पेडणेकर यांनी रुपये एक लाख रुपयेचा चेक राम व लक्ष्मण पवार या बंधुच्या मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करुण आंतराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केद्र पुर्ण होई पर्यंत आपण कोणत्याना कोणत्या स्वरूपात मदत करत राहात असल्याची ग्वाही दिली.
द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै. आमनगी व सुशांत पाटील याच्या मध्ये झाली. यामध्ये एकेरी हाताचा कस चढवुन पै. शिवानंद आमनगी याने विजय मिळवला. तृतीय क्रमांकाची कुस्ती पै आनंद हसशी व पै. हरीशचंद्र याच्यांत काटेजोड होऊण बरोबरीत झाली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती बॉक थ्रो डावावर नेताजी भोसले विजयी, पाचव्या क्रमाकांच्या कुस्तीमध्ये तुडये येथील पै. विकास पाटील लपेटडावावर विजयी, सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये दुहेरी पटाची पकड करूण पै. विष्णुकुमार फाळके (बेळगांव ) विजयी, सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत ढाक डावावर मराठा सेटंरचा पै. दिपक पाटील विजयी, आठव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये एकेरी पटावर सोलापुरचा पै. अमोल कैरे विजयी, नवव्य कुस्तीमध्ये डंकी डावावर तुर्केवाडीचा पै. विक्रम गावडे याने कुस्ती शौकिनांच्या डोळयाचे पारणे फेडले, दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये बांगडी डावावर दाटे येथील पै. सुरज राऊत विजयी झाला.
मैदाणात लहाण मोठया एकुन पन्नास कुस्त्या झाल्या. त्यापैकी बऱ्याच कुस्त्यानी कुस्त्या शौकीनांच्या डोळयाचे पारणे फेडले. यावेळी पंच म्हणुन एन.आय.एस. कुस्ती कोच लक्ष्मण पवार, राम पवार, मारुती धाडी,महाविर जाकनुर, मराठा सेटंर कोच शिवाप्पा पाटील यांनी काम पाहीले. यावेळी चंदगड तालुक्यातील कुस्ती शौकीन मोठया सख्येंने उपस्थित होते. मैदानात कुस्त्यांचे समालोचन श्री कृष्णात चौगुले- राशिवडेकर ( कोल्हापुर ) यांनी कुस्ती शौकीनांना मंत्रमुग्न केले.
No comments:
Post a Comment