चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील शारिरीक व मानसिक अंपगांना न्याय मिळावा. यासाठी चंदगडचे तहसिलदार यांना नुकतेच ज्योतीबा रामचंद्र गोरल व ईतर अपंग बांधवानी आपल्या विविध मागण्यांसाठी निवेदन दिले.
या निवेदनात अस्थिव्यंग, कर्णबधीर, मुकबधिर, मतिमंद, अंध, जर्जर रोगी, तसेच मानसिक विधवा, निराधार, परितक्त्या, अनाथ, देवदासी ईत्यादी सर्व बांधवांच्या वतीने एकुण अकरा विषयांचे मुद्दे सादर करण्यात आले. सरकारी पातळीवर अपंगा बाबतचे निर्णय घरात पोहचावेत. चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटी मघ्ये अपंग कार्यकर्त्याची सदस्य नियुक्त करावी, पाच टक्के निधी बाबत देखरेख करणाऱ्या कमीटीवर अपंग कार्यकर्यत्याची सदस्य म्हणुन नियुक्ती करावी, चंदगड तालुका विधी सेवा व चंदगड पोलीस ठाणे यांच्यावतीने शारिरीक व मानसिक अंपगांना कायदा ओळख व जागृती करीता विशेष बैठकीचे आयोजन करावे, शिफारस देण्याबाबत पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक यांना सुचना देण्यात याव्यात, अंपगांसाठी दर तीन महीन्यातून एकदा शिबीर भरवावे व प्रमाणपत्राची त्या ठिकाणी सेाय करावी, अपंगाना उत्पन्नाचे दाखले सहानुभुतीपूर्वक संबंधिताकडून मिळावेत, अपंगाच्या दारिद्री रेषेचा फेरसर्व्हे करावा तसेच घरकूल योजना व अंत्योदय योजना प्राधान्याने देण्याच्या सुचना कराव्यात. तालुक्यात अपंगाच्या मागणीनुसार व्यवसाय करण्यासाठी दोनशेह स्वे. फुट जागा महत्वाच्या शासकीय कार्यालये व अन्य ठीकाणी मोफत मिळावी, मुख्यमंत्री भेटीबाबत पुन्हा एकदा सविस्तर माहीती व मार्गदर्शन व्हावे अशा मागणीचे निवेदन नुकताच तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनावर जोतिबा गोरल, सतिश कांबळे, संदिप पाटील, लक्क्ष्मण यादव, लक्ष्मण बेनके आदीच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment