उच्च माध्यमिक विभागाकडील व्यापगत पदाना संधी मिळणार - आमदार सावंत, चंदगड दौऱ्यात शिक्षकांशी चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2019

उच्च माध्यमिक विभागाकडील व्यापगत पदाना संधी मिळणार - आमदार सावंत, चंदगड दौऱ्यात शिक्षकांशी चर्चा


कोवाड येथील श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षकांना मार्गदर्शन करताना आमदार दत्तात्रय सावंत व इतर.
कोवाड / प्रतिनिधी

शासनाच्या जाचक अटीतून सध्या शिक्षण क्षेत्र संक्रमण करत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. सततच्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. उच्च माध्यमिक विभागाकडील व्यापगत आलेल्या ४२८ पदांचाही लवकच निर्णय होईल, असे मत पुणे विभागाचे पदवीधर शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले. आमदार सावंत हे गेले चार दिवस चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत. तालुक्यातील शाळांना भेटी देऊन शिक्षक व शिक्षण संस्थांच्या विविध समस्यांवर ते चर्चा करत आहेत . येथील श्रीमान व्ही . पी . देसाई उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. एस. पाटील होते.
आमदार सावंत म्हणाले, ' ' शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतीयुक्त क्रांती निर्माण होते. आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न शासनदरबारी आहेत. ते सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. काही प्रश्न प्रारतावित आहेत. टप्पा अनुदान शाळांना १०० टक्के अनुदान मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. शिक्षक भरती बंदीमुळे अनेक शिक्षकांचे हाल झाले आहेत. पण येत्या काही दिवसात शासन मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु करण्याच्या विचाराधिन आहे. उच्च माध्यमिक विभागाकडील व्यापगत पदाना पुन्हा संधी देण्याच्या हालचाली सुरु असल्याने शिक्षण संस्थानी तात्काळ पाठपुरावा करुन शिक्षकांना दिलासा द्यावा. यावेळी उपप्राचार्य एस. डी. सावंत यांच्या हस्ते आमदार सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. एस. टी. कदम यांनी स्वागत केले. प्रा. व्ही. एस. पाटील, के. एन. तेऊरवाडकर,  प्रा. नितुल कुंभार, प्रा. सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एम. बी. नाईक,  प्रा. एस. एम. माने,  प्रा. ए. टी. पाटील, प्रा. एस. एस. खवनेवाड़कर, प्रा. एस. एल. वांद्रे, एस. पी. पाटील,  डी. एस. नाईक, एस. पी. हरळीकर, लक्ष्मण व्हन्याळकर, सुनिल पदमाकर उपस्थित होते. प्रा. एस. टी. कदम यांनी सुत्रसंचालन केले. एम. बी. नाईक यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment