![]() |
सातारा येथे अटल महापणन पुरस्कार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते स्विकारताना संघाचे अध्यक्ष राजेश पाटील, संचालक तानाजी गडकरी, अभय देसाई व इतर संचालक. |
चंदगड / प्रतिनिधी
अटल महापणन अभियान 2018-19 अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चंदगड
तालुका संघांला राज्यस्तरीय अटल महापणन पुरस्कार सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री
सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष राजेश पाटील,
व्यवस्थापक एस. वाय. पाटील व संचालक मंडळाने हा पुरस्कार स्विकारला. सोलापूर येथील
हुतात्मा स्मृती मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण करण्यात
आला. यावेळी पणन महासंघाचे डॉ. योगेश म्हसे, सुनिल पवार, शिवाजी पहीनकर,
सातारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे
प्रमुख उपस्थित होते. सहकार क्षेत्रामध्ये अटण पणन योजनेअंतर्गत नवीन व्यवसाय सुरु
करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देवून स्वावलंबी बनविणे व सहकारी संस्था बळकटीकरण
करण्यासाठी शासनाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. चंदगड तालुका संघाने या योजनेत
भाग घेवून तुलसी बझार, तांदुळ व फळे महोत्सव यामधून उत्कृष्ट कार्य केल्याने
संघाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तुलसी बझारमध्ये पॅकींग करणारी
अत्याधुनिक मशीन घेवून पॅकींगचे काम सुरु आहे. तुलसी बझारमध्ये ग्राहकापयोगी अनेक
योजना राबविल्याने अल्पावधीत तुलसी बझारच्या अनेक शाखा उभारुन लोकांचा विश्वास
केला आहे. त्याशिवाय अनेक महिलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे. या सर्व
गोष्टीचा विचार करुन शासनाच्या सहकार विभागाच्या वतीने सहकारातील अटल महापणन
पुरस्कार दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष पोमानी पाटील, संचालक अभय देसाई, तानाजी
गडकरी, परशराम पाटील यांच्यासह अन्य संचालक हजर होते.
No comments:
Post a Comment