निपाणी साहीत्य संमेलनाच्या कामी सैन्यदलाच्या अधिकाऱ्याची धडपड - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2019

निपाणी साहीत्य संमेलनाच्या कामी सैन्यदलाच्या अधिकाऱ्याची धडपड

सुभेदार गजानन चव्हाण (निपाणी)
चंदगड / अनिल धुपदाळे
माझ्या मराठीची गोडवी नेईन मी साता समुद्रापार,  माझ्या मराठीची थेारवी साऱ्या जगात सर्वश्रेष्ठ, किती गाऊ मी थोरवी,किती  वर्णवावे मोठेपण, सार जगाचे छोटेपण, कष्ठ घेतात माझे सारे बांधव तुझी वाढावी अखंड किर्ती दिवसागणु, अधिक निघतात  तुझे बोल सा-यांच्या मुखातुन. 
येत्या १९ तारखेला निपाणी येथे मराठी साहीत्यसंमेल होत आहे. या साहित्यसंमेलनाच्या तयारीसाठी निपाणी येथील साहित्यप्रेमी मंडळी मोठ्या जोमाने कार्यरत झाली आहे. मागील काही वर्षे निपाणी येथे मराठी साहीत्य संमेलन झाले नाही. आता हे का झाले नाही, याची कारणे उगळत न बसता स्थानिक साहित्यीक मंडळी व साहित्यप्रेमी मोठ्या जोमाने साहीत्यसंमेलनाच्या तयारीसाठी लागली आहे.
निपाणी येथील साहित्यीक अच्युत माने व त्यांचे सर्व सहकारी साहीत्यसंमेलनाच्या नियोजीत स्थळावर भेटले. या साहीत्यीक मंडळीमध्ये एका वेगळ्याच व्यक्तीचा सहभाग बघुन मनाला समाधान वाटते. ते व्यक्त करताना शब्दांच्या भांडारात जावे लागेल, अशी व्यक्ती कोण? तर ही व्यक्ती एका वेगळ्या विश्वातील म्हणजे हातात बारा महीने बंदुक, स्वभावात कठोरता वाटणारी, दीसण्यासही तसेच व्यक्तीमत्व अशी व्यक्ती म्हणजे नक्कीच सेनादलातील आहे. हा तुमचा अंदाज बरेबर आहे. या व्यक्तीचे नाव आहे सुभेदार गजानन चव्हाण. गावापासुन दुरवर जम्मुमध्ये नोकरी, आता प्रमोशनानंतर उरली सुरली दोन वर्ष, वडिलांनी दुसऱ्या महायुध्दात कर्तव्याची मोठी छाप पाडली. सर्वत्र मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. आझाद हिंद सैन्याचे प्रमुख सुभाषचंद्र बेास, महात्मा गांधी, जगन्नाथ भोसले, जनरल कऱ्याप्पा यांच्या सहवासात राहीलेल्या गोविंद चव्हाण यांनी  भारतीय सैन्यात दमदार कामगिरी बजावल्याने त्यांचा  निपाणीसह सारा परिसर आदर करायचा. वयाच्या 98 व्या वर्षी गजानन चव्हाण यांच्या वडीलांचे निधन झाले. त्याच्या माता आजही ठणठणीत आहेत. दुरवर नोकरी करणाऱ्या चव्हाण यांनी मराठी बांधवांची, मराठ समाजाची मोठ बांधली आहे. इतर भाषिकांत मराठी बद्दल आपुलकी निर्माण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा स्थापन करून महाराजांची ख्याती वाढलेली आहे. मराठी भाषा संमृद्द व्हावी, मराठी भाषेची सीमा भागात होत असलेली गळेचेपी, कर्नाटक सरकारला जागे करण्यासाठी मराठी साहीत्य संमेलने सीमाभागात भरवली जातात. या संमेलनातून सीमाप्रश्नाचा विषय तेवत राहतो. निपाणी हे एक सीमाभागाचे धगधगते ठीकाण आहे. येथुन अनेक उठाव झाले आहेत. या शहराने सीमा भागात आदर्श घडवला आहे. स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्यानंतर भारतातील दिगज्जांनी निपाणी शहराला भेट दिली होती. याची आठवण निपाणीवासीयांनी पिढ्यान पिढ्या जपली आहे. तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची आठवण निपाणीवासीय मोठ्या आदराने करतात. निपाणीत शनिवारी १९ रोजी होणाऱ्या  साहीत्य संमेलनाच्या तयारीसाठी गजानन चव्हाण यांच्या सहकार्याचे मोठे कौतुक होत आहे. चव्हाण यांच्या स्वभावातील मराठी साहीत्यसंमेलनाच्या पूर्व तयारीच्या लगबगीत चाललेली धडपड त्यांची निष्ठा पाहुन एका मिलटरी मॅनला नक्कीच सॅलुट मारावा लागेल. 

साहित्य संमेलनाच्या नियोजीत स्थळावर चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी उपस्थित निपाणीतील साहित्यीक मंडळी.
               
अनिल धुपदाळे, चंदगड

No comments:

Post a Comment