अडकूर / प्रतिनिधी
अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद
आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 18 जानेवारी 2019 रोजी मोफत
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर (ता. चंदगड)
येथे होणाऱ्या या शिबिरामध्ये जेष्ठ नागरिकांचे मोफत तपासणी व रोगनिदान करण्यात येणार
आहे. या शिबिराचे उदघाटन जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड पंचायत समितीचे सभापती बबनराव देसाई असतील. शिबिरासाठी
येणाऱ्या रुग्णांना तज्ञ डॉक्टराकडून आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार व सविस्तर मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ अडकूर परिसरातील रुग्णांनी घेण्याचे आवाहन
आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment