![]() |
रमेशराव रेडेकर |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड, आजरा,
गडहिंग्लज तालुक्यातील युवकासाठी रमेशराव रेडेकर फौंडेशनच्या वतीने शनिवरी 12
जानेवारी 2019 रोजी दुपारी बारा वाजता `स्वामी विवेकानंद जयंती` `राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती`चे औचित्य साधुन `युवा ऊर्जा` मेळाव्याचे आयोजन
केले आहे. युवकांनी आपल्या परिसराच्या विकासाच्या संकल्पना
व्यक्त करणे हा या मेळाव्याचा
मुख्य उद्देश आहे. कॉलेज रोडवरील सोयरीक मंगल कार्यालयात होणाऱ्या या मेळाव्याला
तिन्ही तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रमेशराव
रेडेकर फौंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment