तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या प्रश्नमंजुषेमध्ये शिरोली शाळा तालुक्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2019

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या प्रश्नमंजुषेमध्ये शिरोली शाळा तालुक्यात प्रथम

तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या प्रश्नमंजुषेमध्ये शिरोली शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला. याचे बक्षिस स्विकारताना विद्यार्थी व शिक्षकवर्ग.
अडकूर / प्रतिनिधी
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथे झालेल्या तालुकास्तरीय अध्यक्ष चषक तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत शिरोली प्राथमिक शाळेने लहान गटामधून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे या शाळेच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साईनाथ जिवबा पाटील, सृष्टी वासुदेव नलवडे, दिव्या सुनिल पाटील या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ. सरिता नाईक यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताजीराव देसाई, उपाध्यक्ष जयवंत देसाई, मुख्याध्यापक राजाराम गावडे, तसेच सर्व पालक आणि अडकुर केंद्राचे केंद्रप्रमुख क. ई. पाटील व गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांनी अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment