![]() |
कोल्हापूर येथे `ट्रक्टर ड्रायवर ते एमडीआरटी अमेरिका` या पुस्तकाचे प्रकाशन करताना डिव्हिजन प्रमुख सुधांशू घोडगावकर, ऋता आसगावकर, अरुण उबाळे, प्रसाद शिरोडकर व मध्यभागी अशोक दळवी.
|
चंदगड / प्रतिनिधी
कळसगादे (ता. चंदगड) येथील विमा सल्लागार अशोक बुधाजी दळवी यांच्या `ट्रक्टर ड्रायवर ते एमडीआरटी
अमेरिका` या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर
येथील हॉटेल राहुल डिलक्स येथे झाले. या प्रकाशन सोहळ्याला एलआयसी कोल्हापूर
डिव्हिजन प्रमुख सुधांशू घोडगावकर, मार्केटिंग मॅनेजर ऋता आसगावकर, मार्केटिंग
सेल्स श्री. कुलकर्णी, गोव्याचे ऑल इंडिया एलआयसी एजंट प्रसाद शिरोडकर, दळवीचे
गुरु अरुण उबाळे व कोल्हापूर डिव्हिजनमधील शेकडो एलआयसी एजंट उपस्थीत होते.
एलआयसी कोल्हापूर डिव्हिजन प्रमुख श्री. घोडगावकर म्हणाले ``हे पुस्तक सरळ
सोप्या भाषेत लिहिले आहे. त्याचबरोबर यश मिळविण्यासाठी दळवी यांनी घेतलेले कष्ट व
त्यातून होणारी विविध मानसिकतेच्या मानसांची ओळख यातून होणार आहे. ग्रामीण भागात
काम करत असताना येणाऱ्या अडचणीवर मात करत एलआयसीमध्ये एमडीआरटी अमेरिका होण्याचा मान त्यांनी पटकावला.
यासाठी त्यांनी केलेला संघर्ष निश्चितच इतरांना प्रेरणादीय ठरले असे गौरवोद्गार काढले.`` समाजातील भरकटलेल्या माणसाला योग्य दिशा मिळाली हा एकाच उदेश या
पुस्तकामध्ये ठेवला असल्याची भावना अशोक दळवी यांनी प्रकाशनावेळी व्यक्त केली. यापूर्वी
त्यांच्या वसुंधरा हा काव्य संग्रह प्रकाशीत झाला आहे. हे पुस्तक अमेझानवरही
विक्रीसाठी उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment