चंदगड / प्रतिनिधी
"छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासन व्यवस्था निर्माण केली. भारतातील लोकांच्यामध्ये स्वाभीमान जागृत केला. गुणी माणसांची पारख करून त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी सेापवली. त्या कामात ते यशस्वीही झाले. महाराजांची न्यायव्यवस्था, प्रशासन व्यवस्था, अर्थव्यवस्था जगात सर्वश्रेष्ठ होती. शेतकऱ्यांना सर्व सेवा पुरवणारे, त्यांच्या शेतीमालाला योग्य तो हमीभाव देणारे विश्वाला वंदनीय असे एकमेव राजे होते असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे ईतिहास विषयाचे प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी मुरकुटेवाडी (चंदगड) येथे श्रमसंस्काकार शिबीरात `छत्रपती शिवाजी महाराज` या विषयावर बोलताना व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ. संगिता गेाजगेकर होत्या.
यावेळी व्यासपीठावर तुळजाबाई सेवा सोसायटीचे चेअरमन सटुप्पा भालेकर, व्हा. चेअरमन देवाप्पा नांदवडेकर उपस्थीत होते. या क्रार्यक्रमाचे आयोजन शहीद तुकाराम ओंबाळे गटाने केले होते. सुत्रसंचालन शहीद तुकाराम ओंबाळे गटातील विद्यार्थ्यानी केले. स्वागत सरपंच प्रा. यु. डी. पाटील, प्रा. अनंत कलाजी केले. आभार प्रा. विलास नाईक यांनी मानले.
No comments:
Post a Comment