चंदगडच्या लाल मातीत अधिकारी घडविण्याची क्षमता – पो. उपनिरिक्षक श्री. दळवी - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2019

चंदगडच्या लाल मातीत अधिकारी घडविण्याची क्षमता – पो. उपनिरिक्षक श्री. दळवी

पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल रामकृष्ण दळवी यांचा सत्कार करताना तुकाराम पाटील व इतर मान्यवर.

दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
जिवणात सघंर्ष हा काही तासांचा काही दिवसाचा तर काही वर्षाचा असु शकतो. पण एकदा का तुम्ही त्याचा पिच्छा सोडुन दिलात तर तो आयुष्यभर तुमचा पिच्छा सोडणार नाही. त्यामुळे प्रयत्न सोडू नका. चंदगडच्या लाल मातीत अनेक अधिकारी घडवण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी यांनी केले. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे युवा फौडेंशन स्पर्धा परीक्षा केंद्रा तर्फे सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
प्रा. तुकाराम पाटील यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फ प्रशासनात उत्तम संधी उपलब्ध आहेत. त्यानां योग्य दिशा व मार्गदर्शनासाठी युवा फौऊंडेशन सदैव तत्पर राहील सांगितले. श्री. दळवी पुढे म्हणाले, " मनात कोणताही न्युनगंड न बाळगता विद्यार्थ्यांनी खडतर परिश्रम करून स्पर्धा परीक्षेस यश प्राप्त करावे. यश प्राप्तीसाठी जिद्द आणि कष्टाला पर्याय नाही असे सांगुन तालुक्यातील विद्यार्थ्याना आपण सदैव सहकार्य करणार असल्याचे सांगितले.`` यावेळी जानबा पाटील, परशराम पाटील, प्रियांका कुद्रेमणीकर, तेजस्वीणी कांबळे, राज सुभेदार, अमेय वांद्रे, विकास कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र बोकडे यांनी तर आभार वैभव देसाई यांनी मानले.



No comments:

Post a Comment