दलित वस्ती विकास अनुदान खर्च रक्कमेची माहीती मिळण्याची ब्लक पँथरची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2019

दलित वस्ती विकास अनुदान खर्च रक्कमेची माहीती मिळण्याची ब्लक पँथरची मागणी



चंदगड / प्रतिनिधी
सरकारमार्फत दलित वस्ती सुधारणेसाठी ग्रामपंचायतींना मिळणारा पंधरा टक्के अनुदान खर्च दलित वस्तीवर न करता तो अन्य ठीकाणी केला जात असल्याबाबत समजते. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून शासनामार्फत उपलब्ध झालेल्या निधी कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला. याची माहीती लेखी स्वरूपात मिळावी, अशा मागणीचे निवेदन नुकताच ब्लक पँथरच्या वतीने गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांना यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ``दलित वस्तीवर खर्च करावयाचे असताना काही ठीकाणी खर्च केला जात नाही असे समजते.  तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती साठी पंधरा टक्के अनुदानातून खर्च झाला आहे तर कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला आहे. याची लेखी माहीती पंधरा दिवसात मिळावी. हा निधी अन्य कामासाठी खर्च करणाऱ्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. त्याची लेखी माहीती मिळावी, अन्यता ब्लँक पँथर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची जबाबदारी आपले कार्यालय व शासनावर राहील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदना़वर तालुका अध्यक्ष पंडीत कांबळे,  जिल्हा सचिव दिपक माळी, प्रल्हाद कांबळे, दिपाली चव्हाण आदीच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment