चंदगड येथे गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवारी अभिनय स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2019

चंदगड येथे गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवारी अभिनय स्पर्धेचे आयोजन

ॲड. रवि रेडेकर
चंदगड / प्रतिनिधी
गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवारी 13 जानेवारी 2019 रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समिती सभागृहात अभिनय (क्टींग) स्पर्धेचे आयोजन केल्याची माहीती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रवि रेडेकर यांनी दिली.
अभिनय स्पर्धेचे उद्घाटन चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते होईल. सभापती बबनराव देसाई अध्यक्षस्थानी असतील. यावेळी जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल दैनिक सकाळचे पत्रकार सुनिल कोंडुसकर व को. डी. रि. वे. अ. चा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबदद्ल मटाचे संपत पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला जि. प. सदस्या विद्या पाटील, उपसभापती विठाबाई मुरकुटे, पं. स. सदस्या रुपा खांडेकर, मनिषा शिवनगेकर, नंदिनी पाटील, तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी, पोलिस निरिक्षक एस. एम. यादव, माजी उपसभापती ॲड. अनंत कांबळे, पत्रकार विजयकुमार दळवी यांच्यासह माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, संचालक राजेश पाटील, रमेशराव रेडेकर, सुनिल शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, अप्पी पाटील, गंगाधर व्हसकोटी, विद्याधर गुरबे, ॲड. संतोष मळवीकर व पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांच्यासह पत्रकार उपस्थित रहाणार आहेत. सर्वांनी या स्पर्धेला वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने केले आहे. 



No comments:

Post a Comment