निलेश राणे यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2019

निलेश राणे यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन

निलेश राणे यांच्यावर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन चंदगड पोलिसांना देताना शिवैसनिक. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर स्वाभिमानी पक्षाचे नेते निलेश राणे यांनी गंभीर आरोप करून अपशब्द वापरल्याबददल चंदगड तालुका युवासेनेमार्फत जाहीर निषेध करण्यात आला. शिवसैनिक चंदगड मधील चौकात राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. एखाद्या चांगल्या व्यक्तिवर असे गंभीर आरोप करून समाजात विषमता निर्माण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन चंदगड पोलिस ठाण्याला देण्यात आले. यावेळी युवासेना तालुका प्रमुख पिणु पाटील, तालुका समन्वयक शरद गावड़े, उपतालुका गणेश बागडी, भरमु आपटेकर, प्रदीप पाटील, दीपक पवार, शहर प्रमुख सतीश तेजम, विभाग प्रमुख नीलेश पाटील, किसान पटेल, वैभव ल्हासे, रणजीत अर्दाळकर, विशाल गायकवाड़, सुनील गुरव, दर्शन देसाई यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment