सानिया मुंगारेचे राज्यस्तरीय गायन स्पर्धेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2019

सानिया मुंगारेचे राज्यस्तरीय गायन स्पर्धेत यश

सानिया मुंगारे
चंदगड / प्रतिनिधी
शिवनगे (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सानिया धनाजी मुंगारे हिने मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंच कोल्हापूर मार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नाट्यगीत व भावगीत या दोन्ही गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सुर नवा ध्यास नवा या कलर्स मराठी चॅनेवरील मालिकेसाठी तिची निवड झाली होती. तिने याआधी महाराष्ट्र व गोवा येथील स्पर्धेतून अनेक बक्षिसे मिळवली आहेत. तिला मुख्याध्यापक डी. के. कदम, पी. के. भोसले, डी. जे. पाटील, पी. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


No comments:

Post a Comment