पारगड किल्ल्यावरील विद्युत खांब कोसळले, महावितरणाचे दुर्लक्ष - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2019

पारगड किल्ल्यावरील विद्युत खांब कोसळले, महावितरणाचे दुर्लक्ष


पारगड किल्ला येथे पडलेला विद्युत खांबाच्या पडलेल्या तारामुळे पर्यटकांना अडथळा निर्माण होत आहे.
चंदगड / प्रतिनिधी
एतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे पावसाळ्यात पडलेला विद्युत खांब व विद्युत वाहीन्या अजूनही रस्त्यावर पडलेल्याच अवस्थेत आहेत. याचा त्रास पारगडवर येणाऱ्या पर्यटकासह नागरीकांना होत आहे. 
पावसाळा संपून तब्बल सहा महिने उलटले तरी वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष आहे. एखादी दुर्घटना घडल्या नंतरच वीज वितरण कंपनीला जाग येणार का असा सवाल पारगडवासीयासह पर्यटक करत आहेत. शिवकालीन पारगड किल्ला येथे काही इतिहासिक मंदिर येथे वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत लाईन टाकली आहे. पारगड किल्ला येथे वस्ती केलेल्या लोकांसाठी स्वतंञ वीज जोडणी आहे. गेल्या पावसाळ्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही विद्युत खांब मुळातूनच मोडून पडले आहेत व त्यांच्या तारा देखील तशाच आहे. पावलाळा संपला की खांब उभे करू असे विद्युत कंपनीकडून सांगण्यात आले होते. पावसाळा संपला तरी महावितरण कर्मचारी यांनी खांब उभे केले नाहीत. पारगड ग्रामस्थांनी वेगळी केबल जोडून मंदिरात वीज पुरवठा सुरू केला आहे. हे विद्युत खांब अनेक ठिकाणी तारासह गंजलेले असल्याने पारगड किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हे अडचणीचे ठरत आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून किल्ल्यावर कोसळलेले विद्युत खांब उभे करून नागरीकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.




No comments:

Post a Comment