चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिशनच्यावतीने दिला जाणारा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र टाईम्सचे चंदगड तालुका प्रतिनिधी संपत पाटील यांना प्रदान करण्यात आला. खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह. शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे, मराठी पत्रकार परिषदचे विभागीय सचिव समीर देशपांडे कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थाध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांच्या उपस्थित हा सत्कार सोहळा झाला. तालुक्यात पत्रकारीतेच्या माध्यमातून शेती, शिक्षण, आरोग्य यासह सामाजिक विषयांवर त्यांनी विशेष लेखन केले आहे. पत्रकारीतेतील आजपर्यंतच्या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन जिल्हा पत्रकार संघटनेने त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार दिला आहे. यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नंदकुमार ढेरे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते या कार्यक्रमात देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल धुपदाळे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी अध्यक्ष संजय पाटील, प्रा. अशोक पाटील, चेतन शेरेगार, चंद्रशेखर तारळी, संपादक संतोष भोसले, विजय कांबळे, कॅमेरामन संजय पाटील (दर्पण), संतोष सुतार, युवराज पाटील व बी न्यूजचे राजेंद्र शिवणगेकर यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment