चंदगड / प्रतिनिधी
अडकूर गावातील पाणंद रस्ता सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्यातुन व स्वखर्चाने खुला करण्यात आला. या रस्त्यासाठी ॲड. सुभाष कोट, राजु कापसे व संबधीत सर्व शेतकरी बंधुनी तत्कालीन प्रांताधिकारी संगिता चौगुले-राजापूरकर, तहसिलदार शिवाजी शिंदे यांच्याकडे राजस्व महा अभियातंर्गत पाणंद साठी मागणी करण्यात आली होती.
ही पाणंद सुमारे अनेक वर्षापासून बंद होती. पाणंदच्या दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांनी कोणतीही तक्रार न करता स्व:खुशीने आपल्यातुन जागा दिल्यामुळे ही पाणंद वीना तक्रारी खुली झाली. या कामाचा शुभारंभ सर्कल सौ. राजश्री पचंडी यांच्या हस्ते झाला. यावेळी सौ. पचंडी म्हणाल्या ``अडकूर गावाप्रमाणे तालुक्यातील ईतरही गावातून असा सामजंसपणा दाखवला गेला तर विना तक्रारीने तालुक्यातील पाणंदच्या कामांना गती मिळेल. संबंधीत कामी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तलाठी कातकर आदींनी चांगले सहकार्य केल्यानेत हे काम मार्गी लागल्याचे समाधान व कौतुक उपस्थित अडकूरवासीयांनी केले. यावेळी संदिप आर्दाळकर, युसुफ शेख, चंद्रकांत कोट, शिवदत्त कोट, आप्पा बामणे, गब्रीयल लोबो, पिटर लोबो, गंगाधर कापसे, बंडू सुर्यवंशी, चिदानंद कांबळे, अकबर शेख, हुसेन शेख, रामु बामणे, नारायण खवणेवाडकर यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment