डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल शरद पवार यांच्या हस्ते रविवारी नागरी सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2019

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल शरद पवार यांच्या हस्ते रविवारी नागरी सत्कार

डॉ. प्रतापसिंह जाधव
चंदगड / प्रतिनिधी
गडहिंग्लज नगरपरिषद व आजरा, चंदगड तालुक्यातील सर्वपक्षीय व शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या देशपातळीवरील कार्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या कामाबद्दल व गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे दातृत्वातून उभारलेल्या शैक्षणिक कार्याबदद्ल सन्मान कार्यकर्तृत्वाचा नागरी सत्कार सोहळा रविवारी 13 जानेवारी 2019 रोजी सकाळी दहा वाजता गडहिंग्लज येथील बॅ. नाथ पै विद्यालयात आयोजित केला आहे. 
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील असतील. यावेळी कागलचे आमदार हसन मुश्रीफ, चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन गडहिंग्लज नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी व गडहिंग्लज सभापती विजय पाटील यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment