तेऊरवाडी / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागामार्फत मराठी राजभाषा दिन अर्थात कवी कुसुमाग्रज जन्मदिन विविध उपक्रमांनी पार पडला. कार्यक्रमाची सुरवात नवोदित कवी प्रमोद चांदेकर,हणमंत पाटील,आकाश बोकमुरकर यांच्या हस्ते झाडांला पाणी घालून करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य.आर.एस. निळपणकर होते.
प्रमोद चांदेकर यांनी विठ्ठला तर हणमंत पाटील यांने चायनीज ही सामाजिक भान जागृत करणारी कविता सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. आकाश बोकमुरकर यांने कॉलेजवयीन मुलांच्या मनाचा अंदाज घेत प्रेम कविता सादर करून विद्यार्थ्यांना भुरळ घातली व मराठी बोलीभाषेतील वेगळी लय,वेगळा बाज व तिची उगमस्थाने यांची नोंद घेत मराठीतून करिअर संधी याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात आर.एस.निळपणकर यांनी मार्गदर्शन केले. काव्यमैफिलीत सहभागी सर्वांना डॉ.एस.एम.पाटील लिखित स्त्रीवादी लेखिका-वसुदा पाटील ग्रंथभेट देण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक डॉ.आर.डी.कांबळे यांनी केले.तर सुत्रसंचालन विभाग प्रमुख डाँ.एस.एम.पाटील यांनी केले. यावेळी मराठी विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment