चंदगड विधानसभा मतदारसंघात अग्निशामन दलाची सक्षम यत्रंणा स्थापन करा - आमदार कुपेकर यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2019

चंदगड विधानसभा मतदारसंघात अग्निशामन दलाची सक्षम यत्रंणा स्थापन करा - आमदार कुपेकर यांची मागणी

आमदार संध्यादेवी कुपकेर
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या चंदगड, आजरा, गडहिगलज तालुक्यात अग्निशमन दलाची पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे या तालुक्याना बेळगाव (कर्नाटक) वर आवलंबून रहावे लागत आहे. त्यामूळे या  तालुक्यात कर्नाटक राज्याच्या, धर्तीवर सुसज्ज अग्निशमन दलाची स्थापना करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी खास पत्रातून केली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. आगीच्या घटनेतील नुकसान म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान असल्यामुळे यासंदर्भात सकारात्मक निर्णयाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज नगरपालिकेचे अग्निशमन केंद्र वगळता आजरा व चंदगड तालुक्यात अग्निशमनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे नजीकच्या संकेश्वर व निपाणी येथून अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागते, त्यास विलंब लागत असल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीच्या घटना वारंवार घडत आहे. सहा महिन्यांपूर्वी  चंदगड तालूक्यातील बसरगे नांदवडे,येथे आगीत 25 लाखाचे तर  गडहिग्लज तालूक्यातील  औरनाळ येथील आगीत पाटीलवाड्याचे सुमारे ४० लाखांचे, तर चार दिवसांपूर्वी बसर्गे येथील आगीत सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तीनही तालुक्यात कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सुसज्ज अग्निशमन केंद्र व दलाची स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.


No comments:

Post a Comment